breadcrumb-details

खुशखबर! जगाला मिळणार मेड इन इंडिया लस ! पुण्याची कंपणी 1 मिनिटांत तयार करणार 500 डोस l

Gallery

खुशखबर! जगाला मिळणार मेड इन इंडिया लस ! पुण्याची कंपणी 1 मिनिटांत तयार करणार 500 डोस l

वेगवान न्यूज नेटवर्क
03 August 2020 09:16 AM

पुणे l कोरोना विषाणूने जगात हहाकार माजवला आहे.प्रत्येक देशातील डाॅक्टर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस काम संशोधन करत आहे.जगासह देशात कोरोना लस तयार करण्यासाठी दिवसरात्र ट्रायल्स केले जात आहेत.

काही लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत तर काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात. भारतात जी कंपनी लस तयार करत आहे त्याचे नाव आहे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Insititite of India). दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

कोरोनाची लस मेड इन इंडिया असणार !

ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे.सीरम इंस्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी ही लस मोठ्या प्रमाणात भारतात तयार केली जाणार असल्याचा दावा केला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे.

लस किती वेळात तयार होणार ?

मीडिया रिपोर्टनुसार, ही लस प्रति मिनिटांत 500 वॅक्सिन डोस तयार करणार आहे. दरम्यान किती प्रमाणात ही लस तयार केली जाणार आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही आहे.