breadcrumb-details

दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा,मुंबई-ठाण्यात रात्रभर पावसाचा जोर

Gallery

दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा,मुंबई-ठाण्यात रात्रभर पावसाचा जोर

वेगवान न्यूज नेटवर्क
04 August 2020 08:48 AM

मुंबई l मुंबईतील दादर, मुलुंड, विक्रोळी, वरळी, धारावी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली.

मुंबईतील पावसाची आकडेवारी (पहाटे सहा वाजेपर्यंत)

मुंबई लोकल : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सूचना

पश्चिम रेल्वे - पूर्णपणे ठप्प

हार्बर रेल्वे - कुर्ला ते सीएसएमटी बंद

मुंबई शहर - 230.06 मिमी

मुंबई पूर्व उपनगर - 162.83 मिमी

मुंबई पश्चिम उपनगर - 162.28 मिमी

मध्य रेल्वे - धीम्या गतीने

मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कुर्ला - नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगावमध्ये मोतीलाल नगरात रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं.

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन