breadcrumb-details

नाशिक - बिबट्याचा मुक्त संचार; देवळा तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Gallery

नाशिक - बिबट्याचा मुक्त संचार; देवळा तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
04 August 2020 10:10 PM

दहिवड l तालुक्यातील मेशी, दहिवड परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत चालली असून यापूर्वी रात्री अपरात्री शेतकरयांच्या पशुधनावर हल्ला बिबट्याकडून करण्यात येत होता परंतु आज ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मेशी फाटा येथील खंडू उखा जाधव वय 30 या शेतकऱ्यावर सायंकाळी बिबट्याने हल्ला केला, यात सदर शेतकरी जखमी झाला असून शेजारच्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून त्याला वाचविले, त्यानंतर बिबट्याने एका शेळीवरही हल्ला केला.वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.

परसुल शिवारात बिबट्याचे दर्शनतसेच उमराणे गावाजवळ परसूल धरणाजवळ सांगण्या मागंण्या नावाने प्रसिद्ध डोंगर आहे ह्या डोगराजवळ राहणारे शेतकरी गोरख भावराव देवरे यांच्या शेताजवळ काल दि ३ ला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दहिवड येथील शेतकरी कैलास सोनवणे, साहेबराव सोनवणे, विकी सोनवणे, जावेद तांबोळी हे शेतात जात असताना त्यांना बिबट्या व तिचे पिल्ले यांचे दर्शन झाले. बिबट्या पहाताच त्यांनी पळ काढला एकाचा मोबाईल पडला त्यांनी ही घटना प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय दहिवडकर व उमराना येथील सामाजिक कार्यकर्ते नंदन देवरे यांना कळवली असता तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले.

वन अधिकारी साळुंखे, मोरे, सावकार यांनी परिसराला भेट दिली तसेच उमराणे येथील फोटोग्राफर सतिश देवरे यांनी ड्रोण कॅमेरा आणून शोध घेतला असता अंधार व ढगाळ वातावरणामुळे शोध लागला नाही अखेर आजूबाजूचे सर्व शेतकरी यांना सावधानतेचा इशारा देत शोधकार्य थांबवले होते सकाळी पुन्हा प्रयत्न करण्यात आले बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने दुपारी पिंजरा लावण्यात आला. त्यामुळे दहिवड,उमराणे, मेशी परिसरात घबराहट पसरली आहे.