breadcrumb-details

नाशिक - विद्यार्थ्यांचा वनवास कधी संपवणार ! नाशिककर विद्यार्थ्यांची मागणी...

Gallery

नाशिक - विद्यार्थ्यांचा वनवास कधी संपवणार ! नाशिककर विद्यार्थ्यांची मागणी...

वेगवान न्यूज / अफजल पठाण
06 August 2020 08:33 AM

नाशिक : ज्याप्रमाणे ५०० वर्षाचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला तसा विद्यार्थ्यांचाही वनवास संपावा. अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल आणि परीक्षा घेऊन निकाल कसे द्यायचे ह्या सर्व गोष्टी प्रलंबित आहे साधारणपणे सर्व विद्यार्थीचे निकाल जून महिन्यात लागतो व त्या अनुषंगाने विद्यार्थीचे पुढील भवितव्य ठरत असतो, परंतु आता ऑगस्ट महिना लागला असून ही अजून निकाल लागत नाही निकाल लवकरात लवकर लावावा

यासाठी कॉलेज रोड वरील पोस्ट कार्यलयात नाशिककर  विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे, असे 5000 पत्र राज्यातून पाठवणार आहे.

विद्यार्थ्यांचे पत्रावर जर निर्णय घेण्यात आला नाही तर पुढच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करून पायी मोर्चा काढण्यात येईल, व हा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन शहराध्यक्ष यांना निवेदन दिल्यानंतर ही निर्णय न झाल्यास नाशिक व दिंडोरी मतदार संघातील खासदार व आमदार यांना जागे करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांकडून ढोल वाजव निदर्शने करण्यात येतील. या प्रसंगी अँड अजिंक्य गीते, जय कोतवाल,  महेश गायकवाड, वैभव वाकचौरे, स्वप्नील मोरे, अभिजीत गोसावी, विनोद येवलेकर, शरद आडके, संकेत मुठाळ, शुभम बदान, शुभम शेजवळ, शुभम गोरे, आदी उपस्थित होते.