breadcrumb-details

आज पुण्यात अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता...

Gallery

आज पुण्यात अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता...

वेगवान न्यूज / विवेक गोसावी
06 August 2020 08:38 AM

पुणे l  पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये गुरूवार दि.६ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज नारिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महापालिका हद्दीमधील सर्व नागरिकांना या जाहीर प्रकटनाद्वारे कळविण्यात येते की, भारतीय हवामान विभागाकडून दिनांक ०३/०८/२०२० रोजी प्रसिध्दीस दिलेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक ०३/०८/२०२० ते ०६/०८/२०२० अखेर पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविणेत आली आहे. 

जोरदार पाऊस पडत असल्यास घरीच थांबा. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. पाण्यातील कोणत्याही विद्युत खांबाला, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रीकल डीपी बोर्डला स्पर्श करू नये, अथवा त्या जवळ जाणे कटाक्षाने टाळावे. पादचारी भुयारीमार्ग (अंडरपास सबवे) तसेच पाणी साचलेल्या भागातून वाहनासह/पायी प्रवास टाळावा, असे महानगरपालिका हद्दीमधील सर्व नागरीकांना सुरक्षिततेबाबत आवाहन करणेत आले आहे.