breadcrumb-details

देवळा तालुक्यात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह; रामेश्वर येथे कोरोनाचा शिरकाव

Gallery

देवळा तालुक्यात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह; रामेश्वर येथे कोरोनाचा शिरकाव

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
06 August 2020 10:15 AM

दहिवड l तालुका प्रशासनाला नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालात आणखी १० अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसानंतर पुन्हा कोरोना बाधीत रुग्णांची भर पडल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

   तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ११३ संशयितांचे घशाचे स्त्राव दि.०४ ऑगस्ट मंगळवारी तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी ९३ अहवाल प्राप्त झाले यामध्ये कोरोनामुक्त असलेल्या रामेश्वर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

प्राप्त १० पॉझिटिव्ह अहवालाची सविस्तर माहिती-
रामेश्वर येथे चार रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये ४२ वर्षीय पुरुष,६० वर्षीय पुरुष,१८ वर्षीय मुलगा तर १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
देवळा शहरात तीन रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये
४० वर्षीय महिला,२९ वर्षीय महिला तर ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 माळवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष,उमराणा येथील ३२ वर्षीय पुरुष तसेच मूळची मुबंई स्थित असलेली सद्यस्थितीत पिंपळगाव येथे मामाच्या गावी आलेल्या १२ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे तर 
२० संशयितांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी  दिली आहे.

तालुक्यात आज नऊ वाजेपर्यंत एकूण १७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये २८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून चौघा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत १४४ रुग्ण उपचार घेत आहेत.