breadcrumb-details

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

Gallery

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

वेगवान न्यूज / समीर पठाण
06 August 2020 12:40 PM

लासलगाव l सोमवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथील एका खाजगी हॉस्पिटल येथे रुग्ण उपचार घेताना मृत पावल्याच्या घटनेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांना बेदम मारहाण करुन हॉस्पिटल ची वित्तहानी करण्याची घटना घडली.या घडलेल्या घटनेचा लासलगाव डॉक्टर असोसिएशन तर्फे निषेध करून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले.

सरकारी तसेच खाजगी डॉक्टर्स मागील ४ महीण्यापासुन कोरोना या महामारीच्या संकटात अतिशय शर्थीने अन धैर्याने काम करत असताना देखील काही समाजकंटकांकडुन अशा प्रकारचे हल्ले होत आहेत.तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून डॉक्टर,हॉस्पिटल्स आणि यंत्रणेविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करुन समाजमन दुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्यामुळे या घटनेचा लासलगाव डॉक्टर्स असोशिएशन ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आणि सदर समाजकंटकांवर कठोर कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन सहाय्यक पोलिस निरिक्षक खंडेराव रंझवे यांना देण्यात आले आणि या हल्ल्याविषयीच्या प्रक्षुब्ध भावना शासनदरबारी पोचवण्याची विनंती करण्यात आली 

या प्रसंगी लासलगाव डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ सुजित गुंजाळ,उपाध्यक्ष डॉ अमोल शेजवळ,डॉ विलास कांगणे,डॉ अनिल ठाकरे,डॉ किरण निकम,डॉ अनिल बोराडे,डॉ योगेश चांडक,डॉ मृगेश शहा,डॉ स्वप्निल जैन,डॉ सोनल सोनवणे उपस्थित होते.