breadcrumb-details

देवळा तालुक्यात 17 सप्टेंबरला निघाले ४ कोरोना पॉझिटिव्ह

Gallery

देवळा तालुक्यात 17 सप्टेंबरला निघाले ४ कोरोना पॉझिटिव्ह

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
17 September 2020 10:36 PM

दहिवड l देवळा तालुका प्रशासनाला दिनांक १७ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात देवळा तालुक्यात आणखी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

 

  आज १७ सप्टेंबर रोजी प्राप्त ४५ रिपोर्ट मध्ये ६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३९ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, पॉझिटिव्ह ६ रिपोर्ट पैकी ४ रिपोर्ट देवळा तालुक्यातील व २ रिपोर्ट मालेगाव तालुक्यातील आहेत. प्राप्त 

 

रिपोर्टची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे:-

देवळा शहर दोन त्यात ३६ वर्षीय महिला, १२ वर्षीय बालक

वासोळ एक त्यात ३६ वर्षीय पुरूष, विठेवाडी एक ६० वर्षीय महिला, हे ४ रुग्ण देवळा तालुक्यातील तर सौंदाणे तालुका मालेगाव येथील दोन जण त्यात २८ वर्षीय महिला व २२ वर्षीय पुरुष

अशा ६ जणांचा समावेश आहे.

 

 त्यामुळे जनतेत चिंता व्यक्त करण्यात येत आहे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः हुन तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. तसेच परिसरात अजून रुग्ण वाढू शकत असल्याने जनतेने घबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.