breadcrumb-details

रायगड - विद्युत वाहिनीच्या तार पडून 4 जनावराचा मृत्यू l

Gallery

रायगड - विद्युत वाहिनीच्या तार पडून 4 जनावराचा मृत्यू l

वेगवान न्यूज / राजू शेख
19 September 2020 10:51 AM

रायगड l सुधागड तालुक्यातील गोंदव ग्रामपंचायत हद्दीत विद्युत वाहिनी च्या तारा पडून चार निष्पाप जनावरांचा मृत्यू झाला,यात एकनाथ पाठारे यांच्या 3 म्हशीं व चंद्रकांत पाठारे यांच्या 1 गाईचा समावेश आहे ,महावितरणच्या गळतान कारभारा मुळे जनावरांचा जीव गेल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.

 

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या करिता तालुक्यातील तहसीलदार दिलीप रायन्नावर साहेब यांची भेट घेतली,यावेळी तहसीलदार साहेबांनी तात्काळ महावितरणचे उपअभियंता जतीन पाटील साहेब व पशु वैद्यकीय चे कोकरे साहेब यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून या विषयी चर्चा केली व जनावरांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे सांगितले,तसेच या वेळी कुठली मानवी हानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला असे त्यांनी या वेळी सांगितले.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी आपली प्रतिक्रिया वेगवान न्यूज ला दिली त्यांनी या वेळी सांगितले,आज ज्या शेतकऱ्यांचे जनावरे मरण पावली आहेत त्या करिता आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना योग्य ती मदत मिळावी ही विनंती केली असता तहसीलदार साहेबांनी आम्हाला खूप छान सहकार्य केले त्या बद्दल त्यांचे आभार मानतो,