breadcrumb-details

नाशिक: लोककलावंत मागत आहे इच्छामरण…

Gallery

नाशिक: लोककलावंत मागत आहे इच्छामरण…

वेगवान न्यूज / शरद शेळके
25 September 2020 09:00 AM

नाशिक

          कोरोणाच्या महामारी मुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या अशा आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर,वाघेरे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या यात्रा,उरूस, जयंती, महोत्सव, लग्न वाढदिवस, समारंभ, सोहळे इत्यादि सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत . हे कार्यक्रम सुरू व्हायच्या आतच कोरोनाच्या वैश्विक महामारीने  कलावंतांच्या संसाराची धुळधाण झाली. कोरोनाने मरण्याऐवजी कलावंताला उपासमारीनेच मरण्याची भिती निर्माण झाली आहे ."स्टेजवरचा बादशाह आज भिके कंगाल झाला आहे." ज्याने आयुष्यभर दुस-याच्या चेहऱ्यावरचं आसु घालवुन हसु फुलवलं तोच कलावंत आज मरणासन्न अवस्थेत भिकाऱ्याच जिणं जगत आहे .मुलांचं शिक्षण, लग्नकार्य, आजारपण उपजीविकेसाठी लागणारी साधनसामग्री कुठून आणायची. सरकारकडे  अनेक कलावंतांनी साकडं घातलं मात्र त्याकडं दुर्दैवाने दुर्लक्ष झालं .या बत्तर जिण्यापेक्षा मेलेलं बरं ! अशी आवस्ता कलावंतांची झाली आहे. याकरिता कलावंतांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी असे निवेदनच गायकर यांनी दिले आहे  .महाराष्ट्राच्या जडणघडणीत, लोकसंस्कृती जपुन ठेऊन ती जोपासण्याचे मौलिक व समाजप्रबोधानाचे काम कलावंतांनी केले। आहे.  .शासनाच्या विविध प्रकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून "लोकरंजनातून लोकशिक्षण "देण्याचं महनीय कार्य कलावंतांनी केलेले असतांना उपेक्षित कलावंताला दुसरा मार्गच शिल्लक नसल्याने आपण इच्छा मरणास परवानगी द्यावी .किंवा शासनाने

प्रत्त्येक कलावंताला नुकसान भरपाई म्हणुन एक लाख रुपये मदत म्हणून द्यावी. कलावंताला मोफत हक्काचे घर द्यावं. मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा. आजारपणातील औषध उपचार मोफत मिळावा.कलावंताना वयाच्या चाळीसाव्या वर्षापासून पेन्शन  सुरू करावी.कलावंताला  किमान दहा हजार रुपये पेन्शन द्यावी .रेल्वे व बस प्रवास मोफत मिळावा .कलावंत पुरस्कृत विधान परिषदेवर किमान २ सदस्यांची निवड करावी . कोरोना बाधित कलावंत व परिवारास सरकारी व खाजगी इस्पितळात आरक्षित खाटा उपलब्ध करुन द्याव्यात .अशी मागणी शाहिर उत्तमराव गायकर यांनी केली याच्या प्रती मा. मुख्यमंत्री साहेब,सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक,उपविभागीय अधिकारी  नाशिक,पोलीस अधीक्षक, नाशिक ,तहसीलदार साहेब ,इगतपुरी.यांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.