breadcrumb-details

नाशिक जिल्ह्यात खळबळ, महिला एस टी वाहकाची मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या...

Gallery

नाशिक जिल्ह्यात खळबळ, महिला एस टी वाहकाची मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या...

वेगवान न्यूज / समीर पठाण
28 September 2020 03:02 PM

लासलगाव l येवला बस आगारात एस टी मध्ये वाहक असलेल्या महिलेनं आपल्या तरुण मुलासोबत लासलगाव येथे रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

अंजली भुसनळे,उत्कर्ष भुसनळे अशी या दोघांची नावे आहे.सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लासलगाव जवळील कोटमगाव हद्दीतील डाउन लाईन वरील पोल क्र २२/२३ दरम्यान धावत्या रेल्वे इंजिन समोर दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

 

अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या.अंजली आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष सोमवारी रात्री लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ पोहोचल्या आणि समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वे इंजिनखाली उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.अंजली आणि त्यांच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल का उचलले,दोघांनी आत्महत्या का केली,याचे कारण अद्याप समजू शकले नाही.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलीस करीत आहे.