breadcrumb-details

तळीरामांसाठी खुशखबर ! लॉकडाऊनमध्ये सुरू होणार दारूची ऑनलाइन डिलिव्हरी?

Gallery

तळीरामांसाठी खुशखबर ! लॉकडाऊनमध्ये सुरू होणार दारूची ऑनलाइन डिलिव्हरी?

वेगवान न्यूज नेटवर्क
03 May 2020 01:15 PM

नवी दिल्ली -

मॉल्समध्ये दारूची दुकानं उघडण्यास परवानगी नाही आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सर्वच स्तरातून दारूची ऑनलाइन डिलिव्हरी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, जेणेकरून दारू दुकानांमध्ये गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे देखील पालन होईल.केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये दिलेल्या माहितीनुसार 4 मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन या तिन्ही झोनमध्ये दारूची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ज्याठिकाणी फक्त दारू दुकान आहे, अशा दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

 


कोरोनाच्या या संकटकाळात दारूविक्रीतून मिळणारं उत्पन्न राज्य सरकारांसाठी महत्त्वाचे आहे. या संकटात राज्याचा महसूल अधिक खर्च होत आहे मात्र उत्पन्न कमी झाले आहे. गेल्या वर्षी दारूविक्रीतून देशातील राज्य सरकारांना 2.84 लाख कोटींचा महसूल मिळाला होता.

कधी आणि कशी सुरू होईल होम डिलिव्हरी?

ISWAI (The International Spirits and Wines Association of India ) चे चेअरमन अमृत किरण सिंह यांनी हिंदुस्तान टाइम्स ला दिलेल्या माहितीनुसार नवीन नियम लागू झाल्यानंतर दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करण्यात येईल. आम्ही सेफ शील्डची सुरूवात करू. म्हणजेच काउंटवर ट्रे ठेवण्यात येऊन संपर्करहित विक्री केली जाईल. त्यांनी पुढे सांगितलं की सेफ शील्डच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दारूच्या होम डिलिव्हरीबाबत चर्चा केली जाईल. याकरता स्विगी किंवा झोमॅटोसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची मदत घेतली जाईल.

याकरता राज्य सरकारांबरोबर बातचीत सुरू असल्याचंही ते म्हणाले. ज्यामुळे दुकानांमध्ये गर्दी कमी होईल. यावेळी सेफ शील्ड आणि होम डिलिव्हरीच्या पर्यायाचा विचार करायला हवा असेही ते म्हणाले. सर्व नियमांचे पालन करत याची अंमलबजावणी केल्यास राज्यांना 75 टक्के महसूल मिळेल.सौजन्य - संपादन - जान्हवी भाटकर