breadcrumb-details

ट्रम्प यांच्या पर्सनल असिस्टंटला करोना व्हायरसची लागण

Gallery

ट्रम्प यांच्या पर्सनल असिस्टंटला करोना व्हायरसची लागण

वेगवान न्यूज नेटवर्क
09 May 2020 04:05 PM

वृत्तसंस्थाः

करोना पॉझिटिव्ह ठरलेली व्हाइट व्हाऊसमधील ही तिसरी व्यक्ती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या व्यक्तीगत सहाय्यकाला करोना व्हायरसची लागण झाली आहे. मागच्या अनेक आठवडयांपासून हा व्यक्तीगत सहाय्यक इव्हांका ट्रम्प यांना भेटलेला नाही असे वृत्त सीएनएन वाहिनीने दिले आहे.

इव्हांका आणि तिचे पती जेराड कुशनर यांची शुक्रवारी करोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्राने वाहिनीला ही माहिती दिली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या प्रेस सचिव कॅटी मिलर यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला.