breadcrumb-details

पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

Gallery

पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

वेगवान न्यूज नेटवर्क
10 May 2020 08:49 PM

न्यूयॉर्क :

‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

 

गेल्या दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर संपली. अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मालवली. 

 

 ‘रॉक ऑन’, ‘युवराज’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ अशा हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट आणि लघुपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.