breadcrumb-details

लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांने कोबीच्या उभ्या पिकावर फिरवला रोटर

Gallery

लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांने कोबीच्या उभ्या पिकावर फिरवला रोटर

वेगवान न्यूज / मनोज बागुल
11 May 2020 03:21 PM

 

वटारः

 

नशिबाने आज थट्टा कशी मांडली, ह्या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांची गत आहे, उत्पादन आहे पण मार्केट बंद, सर्विकडे कोरोनामुळे लॉकडाऊन, शेतात तयार झालेला माल विकायचा कसा, भाजीपाला पोहचण्यासाठी मुभा दिली पण माल पोहचतो लॉकडाऊनमुळे गिऱ्हाईकचं नाही तर माल घेणार कोण? असा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.

          कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला चालू वर्षी संपूर्ण उन्हळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला हजारो रुपये खर्चून तयार केलेली शिमला मिर्ची तर शेडनेटमध्येच सडत आहे, टोमँटो,मिरची,कोबी,कोथिंबीरी यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात उत्पदान खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे.

         टोमँटो,मिरची,कोबी,कोथिंबीरी या भाजीपाला पिकांची गेल्या चार ते पाच महिन्यापासून दरात मोठी घसरण झाली असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या ४० ते ४५ दिवसापासून संचारबादीमुळे, सर्व हॉटेल बंद, सर्व शहरे बंद असल्यामुळे कोबी फुकटही कोणी घेत नाही, आत्ता तर चक्क भाजीपाला  बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यावर आली असून काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. दर घसरल्याने उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. 

         येथील संतोष बागुल या शेतकऱ्यांने हजार रुपये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीच्या पिकावर रोटर मारले आहे. दररोजच्या हवामान बदल त्यात महागडी औषधांची फवारणी करून वैताकलेला शेतकरी  वातावरण बदलामुळे कोबी पिकावर करपा,आळी,पाकोळी,आदी रोगांचा प्रादुर्भाव व त्यात लॉकडावूनमुळे मार्केट बंद वैताकून रोटर मारून दिले.

        उन्हाळ्याभर आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिकवलेल्या कांदा दोन पैसे मिळतील या मुळे बरेच शेतकरी चाळीत साठवून ठेवत आहेत. कांद्याचे दर देखील दिवसेंदिवस कोसळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना आशिगत बळीराजाची झाली आहे.