breadcrumb-details

शासकीय गोदामातील धान्य चोरी उघडकीस आणल्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने पत्रकारावर हल्ला

Gallery

शासकीय गोदामातील धान्य चोरी उघडकीस आणल्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने पत्रकारावर हल्ला

वेगवान न्यूज / केशव मुंडे
12 May 2020 08:07 AM

बीड'परळी -

 इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीसाठी काम करणारे वार्ताहर संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आहे. सोमवार, दि.11 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास सदरील घटना घडली. या घटनेत संभाजी मुंडे यांच्यासह मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत.
सोमवार दि.11 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार संभाजी मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. 7 ते 8 जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात संभाजी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. प्राणघातक हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण? याची माहिती पोलीस घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील दोन महिन्यांत परळीत पत्रकारांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
घटनांची माहिती मिळतात पोलिस निरीक्षक राहुल धस यांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात जाऊण जखमींची विचारपूस केली आहे 

       या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, शहरातील अमर मैदानाजवळ शासकीय गोदाम आहे. या गोदामातील धान्य काही चोरटे चोरी करीत होते. ही बाब याच भागात राहणारे पत्रकार संभाजी मुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रारंभी चोरी करणाऱ्या तरूणांच्या पालकांना सांगितले. पण चोरी थांबत नसल्याने मुंडे यांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली. ही बाब संबंधित चोरी कर्णधारांच्या लक्षात येताच चोरी करणाऱ्या टोळक्याने संभाजी मुंडे यांच्या घरावर हल्ला चढविला.

     काल दिनांक 11 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या या टोळक्याने चाकू, धारदार शस्त्र आणि दगडाने संभाजी मुंडे यांच्या घरावर हल्ला केला. शिवीगाळ करीत या टोळक्याने संभाजी मुंडे, मुलगा विष्णू आणि पत्नी पार्वती यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात संभाजी मुंडे हे बेशुद्ध होईपर्यंत त्यांना मारहाण केली, मुलगा विष्णू आणि पत्नी पार्वती यानांही जबर मारहाण करण्यात आली. यात संभाजी मुंडे यांच्या अंगावर ठिकठिकाणी चाकुचे वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत तर मुलालाही जबर मार लागला आहे. या भागातील नागरीकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.
       दरम्यान घटना समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच संभाजी मुंडे व जखमींना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तातडीने उपचार करण्यात आले तर विष्णू मुंडे यांच्या डोक्यात मार लागल्याने त्याला खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.