breadcrumb-details

कोरोना बाबत वेगवान न्यूजवर पंतप्रधान नरेंद मोदी लाईव्ह

Gallery

कोरोना बाबत वेगवान न्यूजवर पंतप्रधान नरेंद मोदी लाईव्ह

वेगवान न्यूज नेटवर्क
12 May 2020 08:10 PM

नवी दिल्लीः

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

आज देशाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला त्यावेळी लॉकडाउन ४ ची त्यांनी घोषणा केली. मात्र याचे नियम या लॉकडाउनचं स्वरुप हे वेगळं असेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आज करोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. तसंच आत्मनिर्भर भारत हा नाराही दिला.

 

 

मोदींनी सांगितलेले स्वावलंबनाचे पाच स्तंभ कोणते?

? स्वावलंबनाचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था

? स्वावलंबनाचा दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा

? स्वावलंबनाचा तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था

? स्वावलंबनाचा चौथा स्तंभ आपली लोकशाही

? स्वावलंबनाचा पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र