header ads
Above Article Ad
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाची आजची स्थिती कशी आहे..

राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना, आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दिवसभराता राज्यात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे.

याशिवाय आज राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ५२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५९,७२,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४३,४३,७२७ (१६.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिलासादायक – राज्यात सहा दिवसात ४ लाख ४२ हजार ४६६ रूग्ण करोनामुक्त

दरम्यान,राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. मागील सहा दिवसांत राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button