header ads
Above Article Ad
लाईफ स्टाईल/ आरोग्य

करोनापासून दूर कसं राहायचं?

​तीन गोष्टी लक्षात ठेवा

 

प्रत्येकानंच तोंड आणि नाक झाकणारा मास्क घालायचा. असं केलं, तर मग लक्षणं नसलेला काय, लक्षणं असलेला रुग्ण तुमच्या शेजारून गेला, तरी तुम्हाला काहीही होणार नाही. थोडक्यात काय? तर प्रतिबंधक उपायांची ‘एस-एम-एस’ त्रिसूत्री कटाक्षाने पाळा. एस म्हणजे सुरक्षित वावर अर्थात सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क आणि शेवटचा एस म्हणजे सॅनिटायझर. मध्यंतरी आणखी एक आवई उठली होती, की लक्षणं नसलेल्या या रुग्णांपासून इतरांना मुळीच संसर्ग होत नाही. हा समज चुकीचा आहे.

 

करोनापासून दूर कसं राहायचं?

कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांना एका प्रश्नाचा घोर लागला. ‘आपल्या समोर खोकणारा, शिंकणारा माणूस आला तर ठीक आहे, त्याच्यापासून सुरक्षित वावर ठेवता येईल; पण दहातले आठ करोना पॉझिटिव्ह लक्षणांशिवाय फिरत असतील, तर त्यांच्यापासून दूर कसं राहायचं?’ उत्तर साधं आणि सोपं आहे. बाहेर पडल्यावर प्रत्येकानंच एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवायचं, कमीत कमी तीन फूट आणि खरं तर सहा फूट.

 

​..तरीही संसर्ग होऊ शकतो

यासाठी एक मूलभूत बाब लक्षात घ्यावी, की ज्यांना लक्षणं नसतात त्यांना करोनाची बाधा झालेली असतेच. त्यांच्या शरीरातही त्या विषाणूंनी शिरकाव केलेला असतो. मात्र, त्यांची संख्या खूप कमी असते. विषाणूंच्या संख्येला ‘व्हायरल लोड’ म्हणतात. या बिगर लक्षणांच्या व्यक्तींमध्ये ‘व्हायरल लोड’ कमी असते. म्हणून त्यांना लक्षणं येत नाहीत, तरीही या व्यक्तीपासून आठ दिवस इतरांना विषाणू संसर्ग होऊ शकतो.

 

​करोनाची नवी लक्षणं

लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या शरीरात विषाणू मोठ्या संख्येनं असतात आणि साधारणतः दुसऱ्या दिवसापासून १४व्या दिवसांपर्यंत, तर क्वचितप्रसंगी २१व्या दिवसापर्यंत त्यांचा संसर्ग होऊ शकतो. जानेवारी महिन्यात करोनाची साथ जगात जाहीर झाली, तोपर्यंत ताप येणं, घसा दुखणं, कोरड्या खोकल्याची ढास लागणं, दम लागणं, न्यूमोनिया होत असल्यानं छातीत दुखणं अशी लक्षणं सांगितली जात होती.

 

​रक्तातील प्राणवायू होणारी घट

जगभरात जसे रुग्ण सर्वत्र वाढू लागले, तेव्हा खूप गळून गेल्यासारखं वाटणं, नखं काळी निळी पडणं, अचानक भोवळ येणं, अंग विशेषतः स्नायू खूप दुखणं, डोकं दुखणे अशी लक्षणं ध्यानात येऊ लागली. ही लक्षणं मुख्यत्वे शरीरातील आणि रक्तातील प्राणवायूचं प्रमाण करोनामध्ये खूप घटत असल्यानं होतात. मार्च, एप्रिलदरम्यान अनेक रुग्णांमध्ये, नाकाला कसलाही वास येणं अचानक बंद झाल्याची तक्रार येऊ लागली. तेव्हा हे लक्षण करोनाच्या लक्षणात अधिकृतपणे सहभागी झालं.

 

​थंडी आणि ताप

करोना विषाणूची बाधा झाल्यावर रुग्णाला शिंका येतात; पण सर्दी होते किंवा नाही, याबाबत दुमत होतं; पण मे महिन्यात संशोधकांच्या लक्षात आलं, की नाक गच्च होणं, नाक चोंदणं. तसंच, नाकातून पाणी वाहू लागणं ही सर्व लक्षणं करोनाच्या रुग्णांमध्ये अगदी सुरुवातीलाच आढळतात. त्याचप्रमाणे ताप येतो त्यात थंडी भरून येणं किंवा ताप येण्यापूर्वी अंगावर काटा येणं अशीही लक्षणं करोनाच्या तापामध्ये येऊ लागतात. ही दोन्ही लक्षणं करोनासाठी आता अधिकृत मानली जाऊ लागली.

 

​करोनाची नवीन लक्षणे

करोनाची लागण झाल्यावर अनेक रुग्णांना मळमळणं, उलट्या आणि जुलाब होणं अशी लक्षणं गेल्या दोन महिन्यांत असंख्य रुग्णांत जाणवू लागली. त्यामुळे संशोधकांनी ही लक्षणंही करोनाच्या रुग्णांमध्ये असतात असं जाहीर केलं. ही सारी नवी लक्षणं अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (सीडीसी) या त्यांच्या आरोग्यखात्याच्या संस्थेच्या वेबसाइटवर अधिकृतरित्या नमूद केली आहेत.- डॉ. अविनाश भोंडवे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button