header ads
Above Article Ad
देश - विदेश

तुम्हाला जर कोरोना झाला असेल तर हे केल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो ? संशोधनातून आलं समोर !

नवी दिल्ली l कोरोना संक्रमितांची धडकी भरवणारी आकडेवारी सध्या समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एक अभ्यासातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या माहामारीत आता दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. यानुसार जर कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीनं सहा आठवड्याच्या आत ऑपरेशन केलं तर मृत्यूचा धोका अडीच ते तीन पटीनं वाढू शकतो.अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे शिकार झालेल्या व्यक्तीला कमीत कमी सात आठवड्यांपर्यंत थांबून मगच ऑपरेशन करायला हवं.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एनेस्थिसियामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. यात संशोधकांनी ऑक्टोबर २०२० दरम्यान ११६ देशात आपातकालीन सर्जरीतून जात असलेल्या ४० हजार २३१ रुग्णांवर परिक्षण केलं होतं.

ज्या लोकांना ऑपरेशनच्या आधी कोरोना नव्हता आणि ऑपरेशननंतर कोरोना संक्रमणाचा सामना कारावा लागला होता. या दोन प्रकारच्या रुग्णांची तुलना करण्यात आली होती.अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार ऑपरेशननंतर ३० दिवसांनंतर मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. यात असं दिसून आलं की, कोरोना व्हायरस संक्रमित नसताना ज्यांनी ३० दिवसांच्या आत ऑपरेशन केलं होतं त्यांच्यात मृत्यूची संभावना १.५ टक्के होती.

जे लोक कोरोनानं संक्रमित होते आणि दोन आठवड्यांच्या आत ऑपरेशन केले होते, त्यांच्यात मृत्यूची संभावना ४ टक्के होती. तीन ते चार आठवड्यांनी ऑपरेशन करत असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूची संभावना ४ टक्के होती. पाच ते सहा आठवड्यांमध्ये ऑपरेशन करत असलेल्या रुग्णांमध्ये ३.६ टक्के आणि सात ते आठ आठवड्यांच्या आत ऑपरेशन करत असलेल्यांमध्ये मृत्यूचा धोका १.५ टक्के होते.

या संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनात जास्त आणि कमी जोखिम असलेल्या वयोगटातील लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, कोणताही व्यक्ती कोरोना व्हायरसनं संक्रमित झाल्यास कमीत कमी सात आठवड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची सर्जरी करू नये. असं न करता कोरोना झालेल्या व्यक्तीनं ऑपरेशन करण्याची घाई केल्यास मृत्यूचा धोका वाढतो.

कसे झाले सिद्ध ?

  • या अभ्यासात दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्सच्या ३१ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या अध्ययनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार सगळे वयोगट, रुग्णांची स्थिती, सर्जरी आणि आपात्कालीन स्थिती यांचा अभ्यास करण्यात आला होता. , आर्थोपेडिक्स, सर्जरी, कार्डियक एनेस्थीसिया, न्यूरोसर्जरी, न्यूरोएनेस्थेसिया आणि कार्डियोथोरेसिक रुग्णांचा यात समावेश करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button