header ads
Above Article Ad
राजकारण

बंगालमध्ये ममता सरकार पुन्हा येणार तर आसाममध्ये कमळाचा जोर

नवी दिल्ली

केरळमध्ये एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल. तर आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्ह दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अगदी थोड्या फरकाने सत्ता कायम राखण्यात यश मिळेल तर तामिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस युती विरुद्ध एआयएडीएमके असा चुरस पहायला मिळेल असा अंदाज टाइम्स नाऊ-सीव्होटर्सच्या ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूबरोबरच पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

यंदा मात्र भाजपाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भाजपाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button