header ads
Above Article Ad
खेळट्रेंडिंग न्यूज

या तारखेपासून भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात

वृत्तसंस्था

 बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. स्थानिक ऑस्ट्रेलियान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली असून ३ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी या चार मैदानांवर भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने खेळतील. बॉक्सिंग डे कसोटीला २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याचं वेळापत्रक अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाहीये, येत्या काही काळात करोनाची परिस्थिती कशी राहते यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 7 news या ऑस्ट्रेलियन संकेतस्थळाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button