देश - विदेशक्राईममहाराष्ट्रलेटेस्ट न्यूज

दाढी करणं भावलं दोन लाखाला ! तुम्ही ही चूक करू नका ?

दाढी करणं भावलं दोन लाखाला ! तुम्ही ही चूक करू नका ?

ऊरळी कांचन l देशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढले आहे. एका युवकाला दाढी करण्यास जाणे महागात पडले आहे. तब्बल दोन लाखांचा फटका बसला आहे.

काय प्रकार ?

बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच भावले आहे.

चोरट्याने भर दुपारी डिक्कीतून सुमारे २ लाखांची रोकड लंपास केली आहे.

उरुळी कांचन येथे काल शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घडलेल्या प्रकाराबाबत सुनील यादव (वय- २५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

उरुळी कांचन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातील एक्सिस बँकेतून यादव यांनी २ लाखांची रोख रक्कम काढली होती.

दुपारी एकच्या सुमारास काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून तो सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता.

दाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ येऊन पाहिले असता, गाडीची डिक्की उघडी दिसली.

आजूबाजूच्या नागरिकांकडे त्याने विचारपूस केली मात्र कोणीही काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली.

त्यानुासर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलीस अज्ञात चोरट्याचा कसा शोध लावता ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हाट्सअप वर बातमी वाचण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…

👇

https://chat.whatsapp.com/J4nau4kjmRG8RVBY9xd4eG

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button