ट्रेंडिंग न्यूजनाशिकमहाराष्ट्रराजकारण

जितेंद्र आव्हाडांना ईडीची नोटीस येणार? – किरीट सोमय्या

जितेंद्र आव्हाडांना ईडीची नोटीस येणार? - किरीट सोमय्या

नाशिक l आतापर्यंत कुणाकुणावर इडी ची कारवाई झाली याची यादीच दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

आज नाशिकमध्ये किरीट सोमय्या यांनी मोठा राजकीय  स्पोट केला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत.

त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली.

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

आतापर्यंत कोण कोणत्या नेत्यांवर झाली कारवाई ?

परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला.

ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले.

शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला, अशी किरीट सोमय्या यांनी दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या पुढे काय म्हणाले ?

यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button