तुम्ही काय करताय ते सांगा,केंद्रावर खापर फोडणं चुकीचे

मुंबईः

केंद्राने मदत करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली असून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज्य सरकार काही झालं तरी केंद्र सरकार आठवतं असा टोला लगावला आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण केंद्राच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे.

“राज्य सरकारचा केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिाय एकही दिवस जात नाही. राज्य सरकारने करोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काय केलं याचा आकडा सर्वांसमोर आला पाहिजे.

केंद्रानं दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचं घोषित केलं असताना तो आणण्याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी साधे ३२ टँकर उपलब्ध करु शकत नाही. वाहतुकीसाठी विशेष विमानांची व्यवस्था का केली जात नाही?,” अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button