खेळ

BREAKING कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका !

नवी दिल्ली l भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांनी अँजिओप्लास्टी केली आहे.

कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता.

कपिल देव यांची कारकीर्द

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button