खेळहोम

कोहलीची एकाकी झुंज; पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया भारी

भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली.
वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) नाबाद आहेत. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

विराट कोहलीनं नाणेफक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्य धावसंखेवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही (१७) तंबूत परतला. भारतीय संघाला लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन यानं पुजाराला बाद करत जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली.

पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रहाणेसोबत कोहलीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. कोहलीनं ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान कोहलीनं ८ चौकार लगावलं. कोहली बाद झाल्यानंतर रहाणेही लगेच तंबूत परतला. त्यानंतर हनुमा विहारीनं (१६) आपली विकेट फेकली. पहिल्या दिवशी सामन्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजचं वर्चस्व दिसून आलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button