header ads
Above Article Ad
देश - विदेश

मोठा निर्णय घेण्याची शक्यता : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार

नवी दिल्ली l गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण आढळले, तर तब्बल 1341 जण दगावले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठा ताण आला आहे.

यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

त्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 11 राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना स्थिती, लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन याबाबत आढावा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या बैठकीत अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button