महाराष्ट्र

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस महाराष्ट्रला झोडपणार…

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस महाराष्ट्रला झोडपणार...

मुंबई l बातमी आहे पावसाच्या संदर्भातली पुढचे चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील पीके सध्या जोमात आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मका, सोयाबीन, तसेच अन्य पिकांची काढण्याची लगभग सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे बळीराजा चिंतातुर अवस्थेत असताना दिसत आहे .

हवामान विभागाकडून 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस हे पावसाचे असू शकतात. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये चार दिवस पावसाचा अंदाज आहे. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या मेघगर्जनेसह पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

आता पुन्हा निसर्ग किती नुकसान करतो याकडे शेतकऱ्यांनी लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button