तंत्रज्ञानट्रेंडिंग न्यूज

अवघ्या 4 रुपयांचा शेअरने बनवले करोडपती…

अवघ्या 4 रुपयांचा शेअरने बनवले करोडपती...

मुंबई l शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. बँक निफ्टी (bank Nifty) ३८३०० च्या जवळ पास खेळत आहे.तर nifty 50 18000 च्या वरती प्रवेश करणार आहे. कोरोना काळात अनेक नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सहभाग नोंदवला मुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

सध्या शेअर बाजारात लॉन्ग टर्न गुंतवणुकदार मालामाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना शेअर म्हणजे एक्सिस बँक (Axis Bank).

या समभागाने गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे.

वीस वर्षापूर्वीची शेअर ची प्राईज एकूण तुमचं तोंडचं पाणी नक्कीच पळणार?

20 वर्षांपूर्वी कवडीमोल भावाने मिळत असलेला एक्सिस बँकेच्या समभागाची किंमत अवघी 4.81 रुपये इतकी होती. ती आता 787.40 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

या कालावधीत एक्सिस बँकेच्या समभागाने गुंतवणूकदारांना 163 पट परतावा मिळवून दिला आहे.

उदाहरण : 10000×4.81 = 48100 मागील किंमत

1000×787.40 = 7874000 सध्याचा रेट

या समभागाने गेल्या एक महिन्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. मात्र, गेल्या 6 महिन्यांत, NSE वरील Axis बँकेच्या शेअरची किंमत 635 रुपयांवरून 787 रुपयांपर्यंत वाढली आहे.

या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 25 टक्के परतावा मिळाला आहे.

यावर्षी 70 टक्के उसळी

एक्सिस बँकेच्या समभागाने एका वर्षात 468 रुपयांवरून 787.4 रुपयांवर झेप घेतली आहे. याचा अर्थ समभागाची किंमत जवळपास 70 टक्क्यांनी वाढली आहे.

एक्सिस बँकेचे शेअर्स गेल्या 5 वर्षात 520.65 रुपयांवरून 787.40 रुपयांवर गेले. गेल्या 10 वर्षात या स्टॉकने 250 टक्के परतावा दिला आहे.त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षांमध्ये, हा स्टॉक 4.81 रुपयांपासून (एनएसईवर 12 ऑक्टोबर 2001 रोजी बंद होणारी किंमत) 787.40 रुपये (एनएसईवर 11 ऑक्टोबर 2021 रोजी बंद किंमत) पर्यंत वाढला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी एक्सिस बँकेच्या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य जवळपास 1.63 कोटी रुपये इतके झाले आहे.

सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना आता 1.25 लाख रुपये मिळतील. तर वर्षभरापूर्वी एक्सिस बँकेच्या समभागात गुंतवणूक केलेल्या एक लाखाचे मूल्य आता 1.70 लाख इतके झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button