बागलाण तालुक्याचे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेणार खासदार डॉ.सुभाष भामरे

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे

सटाणा : तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेणार असा विश्वास आपल्या धुळे व मालेगांव लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. त्यातील तळवाडे भामेर पोच कालवा, हरणबारी डावा कालवा, केळझर डावा कालवा, केळझर चारी क्र.८, सुळे डावा कालवा या कालव्यांना यापूर्वी निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात कामे सुरू झाले आहेत. तर हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र. ८ व अप्पर पुनद प्रकल्प या प्रकल्पांना पाणी उपलब्ध होऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. आता त्यांची अंतिम मंजुरी मिळणारच असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. सिंचनाच्या सर्व कामांच्या प्रगती बाबत खासदार डॉ सुभाष भामरे यांनीदिनांक १५ जून २०२० रोजी नाशिक येथे मुख्य अभियंता आनंद मोरे, उप मुख्य अभियंता श्री.आमले एम.एस., उप मुख्य अभियंता माताडे एन.एम. कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांसोबत बैठक घेतली. त्यात सर्व प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यातील

.   तळवाडे भामेर पोच कालवा

तळवाडे भामेर पोच कालव्याची सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्याचे टेंडर झाले. व काही काम मेकॅनिकल विभागाने केले. या कालव्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी वारंवार पाठपुरावा करून २०१७ मध्ये २१ कोटी रु चा निधी उपलब्ध करून घेतला. त्यात गेल्या २ वर्षात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अनेक अडचणींना तोंड देत वारंवार संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठका घेतल्या. हा प्रकल्प मार्च २०२० अखेर काम पूर्ण करण्याचे शक्य झाले होते. परंतु देशभरात कोरोनाचे संकट असतांना लॉकडाऊनमुळे सदर काम काही दिवस लांबले आहे.  परंतु तरी कठगड बंधारा त्याकाळी पूर्ण केला. आता काही किरकोळ अडचणी दूर करून काम शेवटच्या किलोमीटर पर्यंत म्हणजे तळवाडे भामेर कालव्यापार्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी लागणारा निधी देखील खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पूर्ण उपलब्ध करून दिला असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांचे स्वप्न होईल असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.

.   केळझर डावा कालवा व केळझर चारी क्र.८

केळझर डावा कालवा व केळझर चारी क्र.८ या सिंचन प्रकल्पांची देखील सुधारित प्रशासकीय मान्यता खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी २०१८ मध्येच मंजूर करून घेतलेली आहे. त्यासाठी ८ कोटी रु. चा निधी देखील खासदार डॉ सुभाष भामरे यांनी उपलब्ध करून. सदर प्रकल्पाचे टेंडर होऊन प्रत्यक्ष कामे सुरु झाले असून सदर कामे हे अंतिम टप्यात आहेत. त्यात ० ते १२ किलोमीटर मध्ये १.८ डायमिटर असलेले सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी लागणारे पाईप उत्तम गुणवत्याचे तयार केले जात आहेत. कालव्याची खोदाई पुर्णत्वास आलेली असून येणाऱ्या काही दिवसात पाईप टाकणे सुरु होणार आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी वाहून येणार आहे.

त्याचे पुढील केळझर चारी क्र.८ चे काम पुर्णत्वास येताना दिसत आहे. केळझर चारी क्र.८ चे कान्हेरी नदीवर पाईप टाकणे हे अत्यंत महत्वाचे काम पूर्ण झालेले आहे. ते आता भाक्षी मुळाणे पर्यंत काम काही दिवसात पूर्ण होईल. वरील दोन्ही कालव्यांना २०१८ मध्येच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निधी उपलब्ध करून घेतलेला होता. त्यानंतर त्याचे पुढील वाढीव केळझर क्र.८ चे कामास प्रशासकीय मान्यता द्यावी लागणार. त्याचे पाणी आरक्षित होऊन सर्वेक्षण झालेले आहे. सदर या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे प्रशासकीय मान्यता साठी सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

.   हरणबारी डावा कालवा

हरणबारी डाव्या कालव्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सन २०१७-१८ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून  निधी देखील उपलब्ध करून घेतलेला आहे. सदर कालवा बंदिस्त पाईपलाईन द्वारे घेण्याचे शासनाने ठरविले आहे. म्हणून त्यासाठी नवीन इस्टीमेट करून त्या पाईपांची डिझाईन मेरी विभागाने मंजूर करून घेतलेली आहे. त्याचे टेंडर लवकरच प्रदर्शित होईल. कोरोनाचा महासंकटामुळे काही अडचणी शासकीय स्तरावरून आलेले आहे. त्या दूर करून येत्या काही दिवसात त्याचे टेंडर होऊन प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे.

.   हरणबारी उजवा कालवा

हरणबारी उजवा कालवा हा गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शासकीय मापदंडात बसत नाही म्हणून काम बंद झालेला होता परंतु डॉ. सुभाष भामरे खासदार झाल्यापासून सदर कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले याबरोबरच वाढीव केळझर चारी  चा प्रश्न होता.

 

सदर कालव्यांना पाणी उपलब्ध नव्हते व शासकीय मापदंडातही बसत नव्हते. डॉ. सुभाष भामरे यांनी सदर कालव्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठी साल्हेर -१, साल्हेर -२, वाघंबा वळण योजना  असे तीन वळण बंधारे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी करून घेतले.  त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.ह्या वळण योजनेच्या  माध्यमातून वाढीव केळझर चारी साठी १४.३५ एम सी एफ टी व हरणबारी उजवा कालवासाठी ३७.६६ एम सी एफ टी  पाणी उपलब्ध करून घेतले व शासन दरबारी वरील कालव्यांना  पाणी उपलब्ध असल्याचा दाखला घेऊन त्यांना राज्याच्या पाणीवाटप समितीकडे मंजुरी मिळवून घेण्यास यश मिळवले.  व सदर दोन्ही कालव्यांना शासकीय मापदंडात बसविण्याचे महत्वाचे काम खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. हरणबारी उजवा कालवा व वाढीव केळझर चारी यांच्या सर्वेक्षणासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या सर्वेक्षणात शासनाकडून मंजुरी मिळवून घेतली व त्यांची देखील प्रशासकीय मान्यता शासन स्तरावरून मंजूर करून घेतली. सदर दोन्ही कालव्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  त्यासाठी येणार्‍या सर्व अडचणी दूर करून त्यांचे सर्वेक्षण झालेले आहे.  आता कालव्यांचा प्रस्ताव तयार करून त्यांना अंतिम मान्यता मिळविण्याच्या दिशेने खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे प्रयत्न सुरु आहे.  व त्याला देखील मंजुरी मिळतेय ते काम काम लवकर पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच हरणबारी उजवा कालव्याचे पाणी पाट निताने पासून ते वायगांव सतमाणे पर्यंत व केळझर वाढीव चारी क्र. ८ चे पाणी भाक्षी मुळाणे पासून ते अजमेर सौंदाणे, वायगांव पर्यंत पोचविण्यासाठी आपण कटीबद्द असून  मंजुरी आपण मिळवणार अशी ग्वाही खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

.    सुळे डावा कालवा

सुळे डावा कालवा हा लोहणेर ठेंगोडा पर्यंत येऊन  ठेंगोडयाच्या धरणात त्याचे पाणी सोडून पुढे तालुका पिंपळेदर-दऱ्हाने पासून मुंजवाड येथे आरम नदी पर्यंत आणण्यासाठी मागील  शासनाकडून खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निधी उपलब्ध करून  घेतला आहे. सदर कालव्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे सदर कालवा बंदिस्त पाईप लाईनद्वारे करण्याचे प्रयोजन केले. त्याची डिझाईन मेरी शाखेकडून मंजूर करून घेतली. व सदर कालव्याचे प्रत्यक्षात काम आता लॉकडाऊन नंतर सुरु होईल व पाणी आराम नदी पर्यंत पोहोचणार आहे. असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.

.   अप्पर पुनद प्रकल्प

सटाणा तालुक्यातील अप्पर पुनद हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सदर प्रकल्पचे सन २०१८ -१९ मध्ये पाणी आरक्षित करून घेतले आहे. सदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला त्वरित प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरु करण्याच्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या आहे.

सटाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी २०१७ नंतर २०१८ पर्यंत मंजूर करण्याचे काम मागील शासनाच्या काळात करून. वरील सर्व प्रकल्पांचे राहिलेले कामे हे पूर्ण होतीलच अशी  ग्वाही देखील  खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली आहे.

Back to top button