header ads
Above Article Ad
महाराष्ट्रमुंबई

लॉकडाउनचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस काय म्हणतात…

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी बाबत दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य, पण त्याला पर्याय हवा आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी लॉकडाउन हा उपाय नाही हे मान्य करताना त्यासाठी पर्याय हवा असं सांगितलं. तसंच विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करणार असून पर्यायी मार्ग न सापडल्यास लॉकडाउन करावा लागेल असा इशारा दिला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी इतर देशांनी जाहीर केलेल्या पॅकेजची आठवण करुन दिली आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची असा टोलाही लगावला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button