header ads
Above Article Ad
महाराष्ट्रनाशिक

नाशिक वाईट बातमी : पुढील अजून मोठा अनर्थ टळला, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती !

नाशिक l आज नाशिकच्या घटनेत काळा दिवस म्हणावे लागेल. पालिका रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या आऊटलेटमध्ये झालेल्या लिकेजमुळे प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन मोठी दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत ११ पुरुष आणि ११ महिला अशा मिळून २२ महिलांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. झाकीर हुसेन असे या रुग्णालयाचे नाव आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना तांत्रिक बाबींमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ही दुर्घटनेवेळी एका तरुणाने प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अजून मोठा अनर्थ टळला, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

हे नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय होते. ते नगरविकास विभागाच्या अंतर्गत येतं. हे कोविड स्पेशल रुग्णालय होते. १५७ कोरोनाबाधित रुग्ण दाखल होते. यातील ६१ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची गरज होती. येथे असलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँक जो स्टोरेज टँक असतो त्याच्या आऊटलेटमध्ये लिकेज आढळलं. या टँकमध्ये लिक्विड ऑक्सिजन कॉम्प्रेस करून भरलेले होते. हे ऑक्सिजन हायप्रेशर असंत. सुदैवाने वेल्डिंग करण्यासाठी तिथे असलेल्या सुयोग नावाच्या लिक्विड सप्लायरने लिक्विड ऑक्सिजन दिलं.

त्यावेळी टँकमध्ये २५ टक्के ऑक्सिजन उरला होता. त्याने ऑक्सिजन तातडीने भरला आणि वॉल्व लगेच बंद केला. वेल्डिंग केली, हे काम वेळीच काम करू शकले, त्यामुळे पुढील हानी टळली, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बाबीमुळे ही दुर्घटन घडली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी असलेल्य ऑक्सिजन स्टोरेज टँकच्या आऊटलेटमधील वॉल्व लिकेज झाल्याने प्रेशर ड्रॉप झाला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तेथील पालकमंत्री छगन भुजबळ हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत होतं. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. परंतु या ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला, आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button