header ads
Above Article Ad
नाशिक

नाशिक – म्हैसवळण (टाकेद) घाटात मजुरांची गाडी दरीत कोसळली ! ८ जन गंभीर जखमी…

वेगवान न्यूज / उत्तम गायकर

इगतपुरी – खिरविरे ,तालुका अकोले ,जिल्हा नगर येथे सिमेंट काँक्रेट भरण्याच्या कामासाठी नाशिक इथून २५ मजूर घेऊन गेलेली ४०७ गाडी क्रमांक एम एच 04 EG 8378 गाडीवरचा ड्रायव्हरचा सुटून साईड डिव्हायडरला धडक देऊन गाडीने तीन चार पलटी मारल्यानंतर दरीत गाडी कोसळली .म्हैसवळण(टाकेद) घाटात घडला अपघात.

सदरची घटना ही नगर हद्दीत असून सिमेंट काँक्रेट करणारे मजूर हे युपी एमपी कडील असल्याचे समजते . पंचवीस जणांपैकी सात आठ जण गंभीर दुखापत असून एक जण दगावल्याची माहिती मिळत असून सर्व जखमींना ताबडतोब SMBT हॉस्पिटल ला पाठविण्यात आले आहे.

सदर घटना ही इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी यांनी बघितली व त सर्वांना तात्काळ फोनद्वारे कळविले नंतर मदतीचा ओघ सुरू झाला . अंधारात मदत कार्य केले असून सर्वांना हॉस्पिटलकडे पाठवण्यात आले असल्याचे जोशी यांनी सांगितले .घोटी पोलीस ठाण्याचे पीआय जालिंदर पळे हे घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन उपस्थित झाले असून पुढील तपास करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button