क्राईम

बायकोने आत्महत्या केली म्हणून पतीने घेतला पोलीस ठाण्यातचं गळफास

नाशिक l नाशिक जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. पत्नीने आत्महत्या केली म्हणून बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्यातचं पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.जिल्ह्यातील बागलाण मधील नामपूर येथील आंबेडकर नगर मध्ये प्रकाश भीमराव निकम व पत्नी राजनंदनी प्रकाश निकम व दोन लहान मुले असे एकत्रित राहत होते.

आज पहाटे पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मारहाणी च्या भीतीपोटी प्रकाश निकम यांना पोलिसांना विनवण्या केल्याने पोलिसांनी माणुसकी दाखवून त्यांना जायखेडा पोलीस ठाणे येथे आश्रय दिला.

परंतु आपली पत्नी गेल्याच्या दुःखाने प्रकाश निकम यांनी जायखेडा पोलीस ठाणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित मयत प्रकाश निकम या व्यक्तीवर पोलीस स्टेशन मध्ये कुठलाही गुन्हा दाखल नसताना त्या व्यक्तीस पोलिसांनी स्टेशनला दाबून ठेवले असा आरोप होत आहे. संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये असतांना त्याला सुरक्षा का नव्हती का वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर व्यक्तीने आत्महत्या केली की त्याला जिवे ठार मारले असा प्रश्न आता उपस्थित करीत आहेत. सदर प्रकाराची शासनाने व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button