क्राईमनाशिकमहाराष्ट्र

नाशिक : मुलीचे पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून माय-लेकीचा गळफास घेऊन आत्महत्या…नाशिक जिल्ह्यात हळहळ

मुलीचे पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून माय-लेकीचा गळफास घेऊन आत्महत्या...

नाशिक l कोरोनानं अनेकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. ज्यांना कोरोना होतो त्या वेळेस आपल्या जवळची व्यक्ती ही आपल्यापासून दूर जाते. कोरोनानं होतेच नव्हत झालं आहे. कोरोनानं अनेक प्रकारे छळलं. त्यानं कोणाला अर्ध्यातनं उठवून नेलं, तर कोणाला मृत्यूला जवळ करायला भाग पाडलं. असंच काहीसं नाशिकमध्ये घडलंय.

लहान मुलगी अनया सतत विचारायची, आई पप्पा कधी येणार? तिच्यासाठी आईकडे उत्तर नसायचं. अखेर आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेत असलेल्या आईने अखेर टोकाचं पाऊल उचललं.

सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली.

त्या तिघांचं हसतं-खेळतं कुटुंब. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आणि ते क्षणार्धात विखुरलं गेलं.

सुजाता यांच्या पतीला कोरोना झाला. त्यात त्यांचं आजारपण, कुटुंबाची ओढाताण सुरू झाली.

सुजातांनी मुलगी अनयाला सोबत घेऊन मोठ्या धीरानं या परिस्थितीलाही तोंड दिलं.

मात्र, इतकं करूनही घरातला कर्ता पुरुष वाचलाच नाही. तेव्हापासून घराचे वासे फिरले, ते फिरलेच. आर्थिक विवंचना सुरू झाली.

सुजाता नैराश्याच्या खोल गर्तेत गेल्या. तर मुलगी अनया त्यांना सतत पप्पा कधी येणार हे विचारायची. त्यांनी मुलीला ना-ना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तिला ते समजलं नाही. सुजातांच्या मनानंही ते नीटसं स्वीकारलं नाही. यामुळं त्या मनानं अजून खचल्या. त्यातूनचं त्यांनी चुटपूट लावणारी सुसाईड नोट लिहून ठेवली.

देवाघरून पप्पा येत नाहीत, म्हणून देवाघरी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या अनयासह या जगाचा निरोप घेतला.

काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेनं नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button