महाराष्ट्रनाशिक

नाशिक : इगतपुरीजवळ भीषण अपघात, अक्षरशः पिकअप गाडीचा चक्काचूर !

नाशिक : इगतपुरीजवळ भीषण अपघात, अक्षरशः पिकअप गाडीचा चक्काचूर !

इगतपुरी l मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीतील बोरटेंभे पुलाजवळ धक्कादायक घटना घडली.भीषण अपघाताचे चित्र पाहून तुमच्या अंगावर क्षार येतील.आयशर आणि पिकअप गाडीच्या धडकेत तिघे जण जखमी झाले.आपघातची तीव्रता इतकी भीषण आहे की पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

नेमकं कसा घडला ?
शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना रुट पेट्रोलिंग टीमने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले.

जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिकअप गाडी आयशर वाहनावर धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ हा अपघात झाला.

दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. अपघातात पिकअप गाडीचा चुराडा झाला.

यावेळी अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button