header ads
Above Article Ad
राजकारण

विरोधी पक्षानं आता १ मेपर्यंत घरीच बसावं,’ शिवसेनेचा भाजपला सणसणीत टोला…

मुंबई : लाॅकडाऊनबाबत लोकांनीही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं आहे. त्यामुळं विरोधी पक्षानं आता १ मेपर्यंत घरीच बसावं,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे.

‘ठाकरे सरकारनं राज्यात लॉकडाउन केल्यास लोक रस्त्यावर उतरतील असं विरोधी पक्ष ओरडत होता. पण तसं काहीच झालेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाउन केलं आहे.

लॉकडाउनला लोकांचा तीव्र विरोध होईल, असा इशारा भाजपनं दिला होता. विरोधकांच्या या भूमिकेचा शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुकही केलं आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काल रात्रीपासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्याशिवाय, अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षानं तीव्र विरोध दर्शवला होता.’मुख्यमंत्री ठाकरे हे सात-आठ दिवस लॉक डाऊनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करीत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी ‘बंद’ची आखणी केली आहे.

सरकारच्या मनात आलं म्हणून मागचा पुढचा विचार न करता लॉकडाउन लादलं असं सरकारनं केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना माणुसकीला प्राधान्य दिलं आहे. मागच्याप्रमाणे लॉक डाऊनची घोषणा होताच जो जेथे आहे तेथेच अडकून पडला असं झालेलं नाही, याची आठवणही शिवसेनेनं करून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button