header ads
Above Article Ad
महाराष्ट्रमुंबई

ऑरेंज अलर्ट : शनिवारपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार बरसणार…

मुंबई l बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्यभाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुक्रमे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या दिवशी विभागातील जिल्हयांत मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यासह राज्यांत बहुतांश ठिकाणी १८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल, अशीही शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत पाऊस थांबून थांबून कोसळत असला तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी राज्याची हजेरी लागत आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून, कोकणात देखील पाऊस विश्रांती घेत कोसळत आहे. मुंबईचा विचार करता सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. मंगळवारी मुंबईत अवघ्या ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button