तंत्रज्ञानदेश - विदेश

Paytm : LPG Gas Cylinder बुकिंग करा ! 10001 रुपयांपर्यंत सोनं जिंका !

Paytm : LPG Gas Cylinder बुकिंग करा ! 10001 रुपयांपर्यंत सोनं जिंका !

नवी दिल्ली l वाढत्या माहागाईमुळे पेट्रोल-डिजेलसह घरगुती LPG Gas Cylinder च्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामन्यांना मोठ्या समस्याचा सामना करावा आहे. नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. पण गॅस सिलेंडरवरील एका ऑपद्वारे मोठा फायदा घेता येईल.

आता गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर चेक्क 10000 मिळणार असल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.विश्वास बसत नाहिये ? होय गॅस सिलेंडर बुकिंगवर 10000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवता येऊ शकतो. नवरात्रीच्या दिवसात एलपीजी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस लिमिटेडने (HPCL) आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर आणली आहे.

एलपीजी कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर HP Gas ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोनं (Gold) जिंकण्याची संधी आहे.ही ऑफर मर्यादित काळासाठीच लागू असेल. HPCL ने ट्विट करत सांगितलं, की या ऑफर अंतर्गत जे युजर्स ऑनलाइन पेमेंट सर्विस Paytm (paytm.com) द्वारे गॅसचं बुकिंग करतील, त्यांना 10 हजार रुपयांपर्यंत गोल्ड जिंकण्याची संधी आहे.

म्हणजेच सोनं जिंकण्यासाठी तुम्हाला Paytm (paytm.com) द्वारे सिलेंडर बुक करावा लागेल.
ही ऑफर 7 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर आहे.

कसा मिळणार 10000 रुपयांचा फायदा ?

याचा फायदा काही दिवसच घेता येणार आहे. नवरात्री गोल्ड ऑफरअंतर्गत दररोज 5 लकी विनरची निवड केली जाईल.

Paytm बुकिंगवर मिळेल कॅशबॅक पॉइंट्स – ही ऑफर गॅस सिलेंडर बुकिंग आणि त्यानंतर Paytm (paytm.com) द्वारे पेमेंटवरच लागू आहे. युजर्सने पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुकिंग केल्यास, त्यांना इतरही फायदे मिळतील.

युजर्सला प्रत्येक सिलेंडर बुकिंगवर 1000 रुपयांचे कॅशबॅक पॉइंट्स दिले जात आहेत. दरम्यान, सरकारने LPG Gas Cylinder चे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत.

तेल कंपन्यांनी विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर मुंबईत घरगुती सिलेंडरचा दर 844.50 रुपयांनी वाढून 899.50 रुपये इतका झाला. हे नवे दर 6 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

काही महिन्यांपासून एलपीजी सबसिडी मिळत नसल्याने ग्रहाकांनी खंत व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button