तंत्रज्ञानदेश - विदेश

Paytm IPO : पेटीएम च्या IPO ची किंमत किती असणार ? देशातील सर्वात मोठ्या 16,600 कोटी च्या IPO ला सेबीकडून मंजूरी !

Paytm IPO : पेटीएम च्या IPO ची किंमत किती असणार ? देशातील सर्वात मोठ्या 16,600 कोटी च्या IPO ला सेबीकडून मंजूरी !

मुंबई l सद्या देशभरात IPO मोठ्या प्रमाणात लिस्ट होत आहे.मागील काही दिवसापूर्वी zomato ने IPO लॉन्च केला होता.त्यातून अनेक गुंतवणूकदारांना याचा फायदा मिळाला आहे.त्यामुळे देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत.

चिनी अब्जाधीश जॅक मा यांच्या अँट ग्रुप कंपनीने यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी दिवाळीच्या आसपास आयपीओ लाँच करण्याची तयारी करत आहे.

Paytm देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे मानले जाते. पेटीएमचा आयपीओ १६,६०० कोटी रुपयांचा असेल, पण मूल्यांकनाबाबत असलेल्या मतभेदांमुळे कंपनी २००० कोटी रुपयांची आयपीओ पूर्व (प्री-आयपीओ) विक्री करण्याचा विचार करत आहे.

ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम (Paytm)च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या हवाल्यानुसार सेबीने पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 कम्युनिकेशंसचे ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टर(DRHP) ला मंजूरी दिली आहे.

हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.

सूत्रांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर म्हटले की, सेबीने पेटीएमच्या आयपीओला मंजूरी दिली आहे”. सूत्रांनी म्हटले आहे की, कंपनीच्या वतीने आयपीओच्या आधी फंड मिळवण्याच्या योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय कोणत्याही वॅल्युएशनच्या अंतराबाबत संबधित नाही.

पेटीएमला 1.47-1.78 लाख कोटींच्या वॅल्युएशनचा अंदाज आहे. अमेरिकेतील वॅल्युएशन एक्सपर्ट अश्वथ दामोदरन यांनी फर्मच्या नॉन लिस्टेड शेअर्सची किंमत 2 हजार 950 रुपये प्रति शेअर लावली आहे.

Paytm फ्रेश इक्विटीतून 8,300 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन

कंपनीच्या डीआऱएचपीच्या मते, Paytm साधारण 16,600 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारणार आहे. यामध्ये फ्रेश इक्विटीतून 8300 कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेल (OFS)तून 8300 कोटी रुपयांचा सामावेश आहे.

पेटीएममध्ये सॉफ्ट बँक वॉरेन बफेट आणि ENT इन्वेस्टमेंटसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी पैसा लावला आहे. पेटीएमचे 2 कोटीहून अधिक मर्चंट आहेत.

मात्र सध्या शेअर बाजारात paytm IPO किती रुपयांनी लिस्ट होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button