ट्रेंडिंग न्यूजतंत्रज्ञान

पुढील तीन दिवस “या” बँकेचे फोन पे, गुगल पे बंद राहणार !

पुढील तीन दिवस "या" बँकेचे फोन पे, गुगल पे बंद राहणार !

नवी दिल्ली l भारतातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची कणा असलेल्या एसबीआय ची डिजिटल सेवा काही तास बंद राहणार आहे.

भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

एसबीआयने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केली आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नसल्याचे बँकेने जाहीर केले होते. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती.

या ट्विटमध्ये म्हटले होते की, तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील.

या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील.

कधी एसबीआयची सेवा बंद राहणार?

एसबीआयच्या माहितीनुसार या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत.

या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात.

डिसेंबर 2020 च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.

यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना फोन पे गुगल पे इंटरनेट बँकिंग वापरता येणार नसल्याने समस्येचा सामना करावा लागू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button