महाराष्ट्र हादरलं ! घरात घुसून 6 जणांनी महिलेला का? पाजलं जबरदस्तीने विष

अकोला l महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली. घरात घुसून 6 जणांनी महिलेला विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनैतिक संबंधातून सहा जणांनी घरात घुसून एका विवाहित महिलेला विषारी औषध पाजल्याने संताप व्यक्त केला जात आहे.घरात पीडित महिला एकटी असताना, सहा जणांनी जबरदस्तीनं घरात प्रवेश केला.

दरम्यान विवाहित महिलेस धमकावत आरोपींनी तिला विषारी औषध पाजलं. पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर, शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना पीडित महिलाचा जाब नोंदवून घेतला असून संबंधित सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेहराज ख्यतून युनुस खान असं विष पाजलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे.

काय आहे हे प्रकरण ?

मागील काही दिवसांपासून पीडित महिलेच्या पतीचं फर्जाना परवीन नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध सुरू होते.

या घटनेची माहिती पीडित महिलेला मिळाल्यानंतर, नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. अनैतिक संबंधामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित महिलेचा आपल्या पतीसोबत वाद सुरू होता.

दरम्यान, 3 जुलै रोजी पीडित महिलेचा पती घरी नसताना, आरोपी प्रेयसी फर्जाना परवीन, अब्दुल जब्बार, रेहाना, नजराना, अब्दुल गौस आणि त्याची पत्नी अशा सहाजणांनी पीडितेच्या घरात प्रवेश केला. ‘तू घरातून निघून जा’ अशी धमकी देत आरोपींनी पीडितेशी वाद घालायला सुरुवात केली. तेवढ्यात आरोपी फर्जाना परवीननं उंदीर मारण्याचं औषध ग्लासमध्ये ओतून जबरदस्तीनं मेहराजला पाजलं.

यावेळी मेहराजनं आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे शेजारच्या लोकांनी पीडितेच्या घराकडे धाव घेतली.बरीच लोकं एकत्र जमल्याचं लक्षात घेता, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटना घडल्यानंतर दोन दिवस पीडितेनं झालेल्या भांडणाबद्दल आपल्या पतीला काहीही सांगितलं नाही. पण 5 जुलै रोजी पीडित विवाहिता मेहराजची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल.

पण प्रकृती आणखी खाल्यावल्यानं तिला अकोला याठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. याठिकाणी उपचार सुरू असताना पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button