header ads
Above Article Ad
महाराष्ट्रपुणे

अजित पवार पुण्यात कडक लॉकडाऊन लावणार का?

पुणे l पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर बोलताना पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यायालयाला सूचना करण्याचा अधिकार आहे मात्र आणखी कडक लॉकडाऊन लावायचा का? हे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील असं स्पष्टपणे सांगितलं.

पुणे शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता कडक लॉकडाऊन लावा’ अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानं खळबळ माजली आहे. 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत असं सांगत न्यायालयाने मुंबईशी तुलना करत पुण्यात कोरोना रोखण्यासाठी अशा उपाय योजना का करत नाही, असा सवालही सरकारला विचारला.

‘कोरोनाचे रुग्ण शहरात कमी होत आहे, मात्र ग्रामीण भागात वाढत आहेत.ऑक्सिजन तुटवडा नाहीये. मात्र लशी नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. सिरम संस्थेचे आदर पुनावाला हे परदेशात आहेत ते 10 ,15 दिवसांनी परतल्यावर त्यांना लशी विषयी विचारू, असं पवार म्हटले. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी मात्र ‘न्यायालयात जी आकडेवारी मांडण्यात आली ती जुनी आहे तसंच ती पूर्ण जिल्ह्याची आहे.

गेल्या 15 दिवसात 15 हजार सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली. पुण्यात 66 हजाराहुन आता 39 हजार इतकी या घडीला positive रुग्ण संख्या आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहेत, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. अशा स्थिती आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही’ अशी रोखठोक भूमिका महापौरांनी घेतली.

तथापि कोर्टात पुणे महापालिका प्रतिज्ञापत्र सादर करून वस्तुस्थिती मांडेल, कारण नागरिकांमध्ये कडक लॉकडाऊन लागेल अशा बातम्यांमुळे नाहक भीती पसरेल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.यामुळे कोर्टात नेमकी जुनी माहिती कुणी आणि का दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय ही आकडेवारी जर संपूर्ण जिल्ह्याची असेल तर मग शहरात रुग्ण संख्या कमी होत असताना कडक लॉकडाऊन लावावा का हाही सवाल निर्माण झाला.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याबाबत काय निर्णय घेतात तसंच पुढील सुनावणीवेळी महापालिका जेव्हा प्रतिज्ञापत्र मांडेल तेव्हा कोर्ट परत काय सूचना देईल याकडे पुणेकरांचे लक्ष असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button