header ads
Above Article Ad
महाराष्ट्ररायगड

रायगड – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला मनसेचा दणका ! सर्व मागण्या मान्य…

वेगवान न्यूज / राजू शेख
रायगड l एकी कडे कोरोनो चा उद्रेक असतांना,आज सर्व कर्मचारी वर्ग तसेच गोर गरीब शेतकरी तथा इतर कामगार वर्ग जो मोल मजुरी करून आपलं उदारनिर्वाह चालवात आहेत अश्या सगळ्याना या कोरोनो च्या महामारीन संकटात आणलं आहे अश्यातच,महाराष्ट्र शासनाने लाईट बिल संदर्भात एक नियमलावली बनवली होती जेणे करून महाराष्ट्रच्या जनतेला त्याचा त्रास होणार नाही,लाईट बिल धारकाची रिडींग द्वारे बिल न काढता ते सरासरी ने देण्यात यावे परंतु अस असलं तरी आजचा लोकांचा संघर्ष पाहता ते भरणे पण शक्य नाही कारण लॉकडाऊन च्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने तसेच उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत,अन्नधान्यासाठी पैसे खर्च करावे की लाईट बिल भरावे असा प्रश्न सर्वा समोर पडला आहे,बिल भरणे आवाक्याच्या बाहेरचे असून ते अदा करणे ही अशक्य आहे

याच विषयावर चर्चा करण्यासाठी साठी आज सुधागड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली भरमसाठ बिल तसेच अन्य काही गोष्टींन करता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सुधागड पाली येथे जाऊन सविस्तर चर्चा केली.

सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली मनसे चे पदअधिकारी यांनी उपअभियंता श्री पाटिल यांची भेट घेतली व वाढीव वीज बिल व इतर विषयांवर चर्चा केली,मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी यावर उपअभियंता पाटील यांना सांगितले की सगळी कडे कोरोना विषाणूने थैमान घातले असता आज नागरिकाची आर्थिक परिस्थिती पुर्ण हालाकिची होऊन बसली आहे लोक अडचणीत आहेत त्यात ही बिल भरमसाट आली आहेत अश्यातच जी बिल आली आहेत ती सर्व आवाक्याच्या बाहेरची आहेत गोरगरीब जनतेला ती भरणे अशक्य आहे,

अशी अंधाधुंद बिल सामान्य जनतेने का भरावी आणी अस असल तरी ही बिल भरली जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका मनसे कडून मांडण्यात आली या विषयावर उपअभियंता पाटील साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तशीच जास्तीची बिल कमी करून देऊ असे सांगितले तसेच बिल भरण्यासाठी कुणाला तगादा लावणार नाही व जे बिल दिल गेलं आहे हे तीन टप्प्यात घेण्यात येईल अस त्यांनी यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे याना सांगितले यावेळी मनसे चे विभाग अध्यक्ष केवळ चव्हाण,रोहित दळवी ,सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव ,नाड़सुर ग्रामपंचायत सदस्य मिलींद शेळके,नरेश पांगारे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button