ट्रेंडिंग न्यूजतंत्रज्ञानदेश - विदेशमहाराष्ट्रलेटेस्ट न्यूज

लाभ घेण्यासाठी रेशन कार्डला मोबाईल नंबर अपडेट केला का ? एका क्लिकवर आजच अपडेट करा

रेशन कार्डला मोबाईल नंबर अपडेट केला का ? एका क्लिकवर आजच अपडेट करा

नवी दिल्ली l आपल्या ठोस पुरावा म्हणून मानल्या जाणा-या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे.

सर्वसामान्य जनतेला नेहमी रेशन कार्डची गरज भासत असते. यामुळे
जर रेशन कार्डवर तुम्ही चुकीचा नंबर टाकला असेल किंवा नंबर बदलला असेल आणि कार्ड अपडेट झालेले नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते.

यासाठी तुम्ही उशीर न करता रेशन कार्डमध्ये (Ration Card) आपला मोबाइल नंबर अपडेट (Update Mobile Number) करा.

आता रेशन कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.रेशन कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करणे अतिशय सोपे आहे.

तुम्ही घरबसल्या सहज हे काम करू शकता. जर तुम्ही रेशन कार्डमध्ये जुना मोबाइल नंबर टाकला असेल तर तुम्हाला रेशन संबंधी अपडेट मिळणार नाही.

विभागाकडून दररोज मेसेजद्वारे अपडेट पाठवले जाते.

– सर्वात आधी ही साईट https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx वर भेट द्या.

– वेबसाईट ओपन केल्यानंतर एक पेज ओपन होईल. येथे Update Your Registered Mobile Number दिसेल.

– या खालील रकान्यात माहिती भरा.

– कॉलममध्ये Aadhaar Number of Head of Household/NFS ID लिहा.

– दुसर्‍या कॉलममध्ये Ration card No लिहा.

– तिसर्‍या कॉलमध्ये Name of Head of Household लिहा.

7. शेवटच्या कॉलमध्ये नवीन मोबाइल नंबर लिहा आणि सेव्ह करा.

8. आता मोबाइल नंबर अपडेट होईल.

‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू
देशातील 20 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एक जून 2020 पासून रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू झाले आहे.

या योजनेंतर्गत कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. आंध्र प्रदेश, तेलंगना, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमन-दीवमध्ये अगोदरच ही योजना लागू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button