पंकजा नाराज ! केंद्राकडून राज्यातलं राजकारण बिघडवण्याचं काम – संजय राऊत

मुंबई l केंद्राकडून राज्यातलं राजकारण बिघडवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची राजकीय चर्चा आहे ती मीडिया मार्फत वाचली, असंही संजय राऊत म्हणाले.

ईडी आणि सीबीआयच्या मार्फत जी दहशत पसरवण्याची पद्धत सुरु आहे. ती फार काळ चालत नाही, अशा पध्दतीने जो काम करतो तो लवकर संपतो, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पिंपरी चिचवड महापालिका निवडणूक आणि राज्यातील राजकारणावर भाष्य केलं.

भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड यावर निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वी भाजपनं सांगितलं होतं. पिंपरी चिंचवड मध्ये राजकारण करणारे मुंबईत असतात सध्याच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी हे अर्धे राष्ट्रवादीचे आहेत. सतत पक्ष बदलणारे स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. पिंपरी स्मार्ट सिटी मधला घोटाळा गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button