ट्रेंडिंग न्यूजखेळदेश - विदेश

धोनीचा शेवटचा बाॅलचा शाॅट पाहून चिमुकले बहिण-भाऊ रडले ! पाहा व्हिडीओ

धोनीचा शेवटचा बाॅलचा शाॅट पाहून चिमुकले बहिण भाऊ रडले ! पाहा व्हिडीओ

मुंबई : देशात आयपीएलचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. आपण अनेक सामने पहायले असेल काल झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कॅप्टन धोनीची चांगलीच जादू पहायला मिळाली. कॅप्टन कूलची जादू पाहून चाहत्यांनाही आनंदाश्रू अनावर झालेले पहायला मिळाले.

आयपीएलचा 14 वा हंगाम खूप जोरदार पहायला मिळाला. काल पहिला क्वालिफायर सामना झाला असून चेन्नई सुपरकिंग्सनं दिल्ली कॅपीटल्सवर शानदार विजय मिळवला.क्वालिफायर सामन्यात महेद्रसिंग धोनीनं 6 बाॅलमध्ये 18 रनांची जोरदार खेळी केलेली पहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर धोनीची फटकेबाजी पाहून धोनी फॅन्सला अश्रू अनावर झाले.

धोनीची जोरदार खेळी पाहून मैदानात आलेले त्याचे चिमुकले चाहतेही रडू लागले. ‘यलो आर्मी’चे दोनही चाहते आपली टीम जिंकताना पाहून भावूक झाले आणि रडू लागले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायर होत आहेत.अशातच धोनीच्या एका चाहतीनं तर सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.

जेव्हा धोनीला समजलं….

यावेळी सीएसकेच्या विजयानंतर जेव्हा धोनीला समजलं की, त्याचा विजयी शॉट पाहून लहान मुलगी आणि तिचा भाऊ रडत होते. त्यावेळी माहीने सामन्याचा बॉल चिमुरडीला गीफ्ट म्हणून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button