ट्रेडिंग, शेअर मार्केट

एक काम बाकी राहू द्या ! पण Stock market मध्ये आज या शेअर्स वर लक्ष ठेवा ?

एक काम बाकी राहू द्या ! पण Stock market मध्ये आज या शेअर्स वर लक्ष ठेवा ?

मुंबई l आज सव्वा नऊ वाजता शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स sensex 60295 अंकांनी सुरू झाला. तसेच सर्वात low आज 59967 अंकापर्यंत खाली आला होता.

सध्या ट्रेड करत असेल…

Sensex – 60215

Banknifty – 39066

Nifty 50 – 18000

सेन्सेक्स मंगळवारी 112.16 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 60,433.45 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.20 अंकांच्या अर्थात 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 18,044.30 वर बंद झाला. दोन दिवसांच्या तेजीनंतर, आज बाजारात नफा वसुली दिसली.

सेन्सेक्स आणि निफ्टी लाल मार्कवर अर्थात घसरणीसह बंद झाले. (stock-market-which-stock-should-you-choose-today?)

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बँकिंग शेअर्स घसरले. मात्र, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नाही तर दिग्गज शेअर्सच्या तुलनेत लहान आणि मध्यम शेअर्सने चांगली कामगिरी केली.

बहुप्रतिक्षित पायाभूत सुविधा विधेयक अर्थात इंफ्रास्ट्रक्चर बिल मंजूर होऊनही, यूएस बाजार सावधगिरीने व्यवहार करत असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे इथे सगळ्यांच्या नजरा अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर आहेत असेही नायर म्हणाले.(stock-market-which-stock )

निफ्टीने डेली स्केलवर एक बियारिश कँडल तयार केली ज्याचा अर्थ मंदी आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांपासून निफ्टी उच्चांकी पातळीवर आहे. आता निफ्टीला 18150 आणि 18350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 18000 च्या वरच राहावे लागेल. खाली निफ्टीला 17,850-17,777 स्तरांवर चांगला सपोर्ट आहे.

निफ्टी मंगळवारी 18,000 च्या वर बंद झाला आहे. हे एक चांगले लक्षण असल्याचे शेयर मार्केट जाणकरांचे मत आहे.   जर निफ्टी या स्तरांवर राहिला तर तो आपल्याला 18,400-18,600 च्या दिशेने जाताना दिसेल. 17,600 वर निफ्टीला चांगला सपोर्ट असल्याचे बोललं जातं

आज कोणत्या शेअर्सवर तुमचा फोकस असेल ? (stock-market-which-stock )

– एस्कॉर्टस (ESCORTS)

– भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

– टाटा पॉवर (TATA POWER)

– गुजरात गॅस (GUJGASLTD)

– महिंद्रा अँड महिंद्रा (M & M)

– टाटा मोटर्स (TATA MOTORS)

– हिरो मोटो कॉर्प ( HEROMOTOCO)

– भारतीय स्टेट बँक (SBIN)

– ओएनजीसी (ONGC)

– आयडिया (IDEA)

महत्वाची माहिती : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button