“या मोठ्या हिंसाचार” प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदविणार

पुणे – भीमा कोरेगावप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.करोनामुळे रखडलेले भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे कामकाज येत्या 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आला आहे. या चौकशीचे कामकाज 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये पवार यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवार यांचा जबाब नोंदविण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. शरद पवार काय जबाब देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button